breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

कोरोना व्हायरसचं राज्यावर संकट, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महत्त्वाचे निर्णय…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेमध्ये राज्यात कोरोना व्हायरसचे वाढत प्रमाण पाहता काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत…राज्यामध्ये होणारा करोनाचा फैलाव थांबवण्यासाठी राज्यामध्ये एपीडमीक एक्ट १९४५ नुसार सरकारने काही सूचना जारी केल्या आहेत…

  • राज्यामध्ये एकूण १७ रुग्ण अढळून आले आहेत. यामध्ये मुंबईत तीन, ठाण्यात एक, नागपूरमध्ये एक आणि पुण्यात दहा रुग्ण आहेत.
  • सर्व रुग्णांची लक्षणे ही सौम्य स्वरुपाची आहे.
  • पुणे, पिंपरी-चिंचवडमधील शाळा पुढील सुचना मिळेपर्यंत बंद राहणार. मुंबई-ठाण्यांमधील शाळांबद्दल सध्या कोणताही निर्णय घेण्यात आलेले नाही.
  • शक्य असेल तिथे घरुन काम करण्याची मूभा म्हणजेच वर्क फ्रॉम होमची परवानगी द्यावी.
  • मुंबई, पुणे, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूरमधील थेअटर्स, स्वीमींगपूल, जीम बंद ठेवण्याचे आदेश.
  • सार्वजनिक ठिकाणी एकत्र येणे टाळावे.
  • आज मध्यरात्रीपासून निर्णय लागू होणार.
  • अनावश्यक प्रवास जनतेने टाळावा.
  • मॉल, हॉटेल सुरु ठेवण्यात आले आहेत. मात्र अशा ठिकाणे जाणे टाळावे.
  • सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणारे कार्यक्रम टाळावे. अशा राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी परवाणगी मिळणार नाहीत. तसेच याआधी परवानगी मिळाली असेल तर ती रद्द केली जाईल.
  • बस आणि रेल्वे या अत्यावश्यक सेवा असल्याने त्या बंद करता येणार नाहीत. त्यामुळे या सेवा चालू राहणार.
  • दहावी आणि बारावीच्या परिक्षा सुरुच राहणार. इतर परिक्षा पुढे ढकलण्याचा विचार सुरु.

सध्या राज्यात कोरोना व्हायरसमुळे भितीचं वातावरण पहायला मिळतय…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button