breaking-newsराष्ट्रिय

कॉंग्रेस नेते शिवकुमार यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांवर छापे

बंगळूर -कर्नाटकमधील कॉंग्रेसचे वजनदार नेते डी.के.शिवकुमार यांच्या निकटवर्तीयांशी संबंधित ठिकाणांवर काल  सीबीआयने छापे टाकले. चलनातून बाद करण्यात आलेल्या नोटांची अवैध अदलाबदल करण्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली. सीबीआयच्या पथकांनी सकाळ उजाडण्यापूर्वीच बंगळूर, कनकपुरा आणि रामनगरमधील पाच ठिकाणी छापे टाकले. शिवकुमार यांच्या निकटवर्तीयांशी संबंधित घरे आणि एक कार्यालय या कारवाईचे लक्ष्य ठरले. रामनगरमधील कॉर्पोरेशन बॅंकेचे मुख्य व्यवस्थापक बी.प्रकाश यांनी काही अज्ञात व्यक्तींशी संगनमत करून 14 नोव्हेंबर 2016 या दिवशी चलनातून बंद करण्यात आलेल्या 10 लाख रूपयांच्या नोटा अवैधपणे बदलल्याचा आरोप आहे. त्यावरून संबंधित कारवाई करण्यात आल्याचे सीबीआयकडून सांगण्यात आले.

दरम्यान, सध्या आमदार असणारे शिवकुमार आणि त्यांचे खासदार बंधू डी.के.सुरेश यांनी सीबीआयचे छापासत्र म्हणजे भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सुडापोटी उचललेले पाऊल असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. इतरांना लक्ष्य करून आमच्यापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न होत आहे. आम्ही कुणाच्या दबावापुढे झुकणार नाही. कुठल्याही आव्हानाला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे, असे शिवकुमार आणि त्यांचे बंधू सुरेश यांनी म्हटले. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सीबीआयच्या छापासत्राचा निषेध करताना केंद्र सरकारकडून कॉंग्रेस नेत्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला. कर्नाटकमध्ये सरकार स्थापनेवरून अलीकडेच मोठे राजकीय नाट्य सुरू असताना कॉंग्रेस आमदारांना एका रिसॉर्टमध्ये एकत्रित ठेवण्याचे श्रेय शिवकुमार यांना दिले गेले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button