breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

कार्यकर्त्यांनो सबुरीने घ्या – माजी आमदार विलास लांडेचे आवाहन

– शिरुर लोकसभा मतदार संघात उमेदवारीवरुन वादंग
पिंपरी ( महा ई न्यूज ) – शिरुर लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या जाहीर मेळाव्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इच्छुक उमेदवाराबाबत थेट जनतेतून हात उंचावून पाठिंबा घेत चाचपणी घेतली. त्यावर माजी आमदार विलास लांडे यांच्यासह अन्य इच्छुकांना कमी पाठिंबा मिळाला. तर अभिनेते डाॅ. अमोल कोल्हे यांच्या उमेदवारीसाठी उत्स्फुर्त पाठिंबा मिळाला. त्यावरुन भोसरीतील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी लांडे यांनाच पक्षाने उमेदवारी द्यावी, आम्ही उप-या उमेदवाराचे काम करणार नाही, अशा पोस्टर समाज माध्यमातून व्हायरल करीत पक्षावर दवाबतंत्र करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, शिरुर लोकसभा निवडणुक उमेदवारीवरुन अजूनही संभ्रमावस्था असून कोणीही समाज माध्यमावर पक्षाची प्रतिमा खराब होईल, असे वर्तन करु नये, असे आवाहन माजी आमदार विलास लांडे यांनी केले आहे. 
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवरुन माजी आमदार विलास लांडे यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींविरोधात एल्गार केला आहे. शिरुर लोकसभा मतदार संघात ‘उपरा’ उमेदवाराचे काम करणार नाही, असा इशारा देवून अनेक ‘पोस्ट’ सोशल मीडियावर व्‍हायरल केल्या जात आहेत. यावरुन पक्षक्षेष्ठीकडून विचारणा झाल्यानंतर लांडे यांनी मवाळ भूमिका घेतली आहे.
यासंर्दभात माजी आमदार विलास लांडे यांनी म्हटले की, आजवर माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पताका मिरवत पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी अखंड आणि अविरत राबलेल्या माझ्या सर्व जिवाभावाच्या कार्यकर्ता मित्रांनो !
गेल्या अनेक दिवसांपासून आपण लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघामध्ये आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी जीवाचं रान करीत आहात, आपण माझ्या पाठीशी उभे राहिलात आणि मी लोकभावनेचा आदर ठेवून लोकसभा निवडणुकीसाठी प्रतिस्पर्ध्यांविरोधात दंड थोपटले. या समाजातील विविध घटकांची भेट घेऊन, चर्चा करून, अनेक ठिकाणी समेट घडवून आणत असताना आपला पाठिंबा आणि निस्वार्थी सहकार्य मला मिळाले आणि या संघर्षाला अजून बळ मिळत गेले.
आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने लोकसभा निवडणुकीत उमेदवार कोण असेल? ही संभ्रमावस्था अजूनही कायम असताना; आपण माझ्या नावाचा पुकार बुलंद ठेवलात, त्याबद्दल मी आपला शतशः आभारी आहे. तरीही उमेदवारीच्या अनुषंगाने आपण कुठेही, कुठल्याही  समाज माध्यमांवर आपल्या पक्षाची प्रतिमा खराब होईल असे वर्तन करू नये, ही कळकळीची विनंती, करुन कार्यकर्त्यांनो… सबुरीने घ्या, पक्षकार्य ताकदीने करा, असा सुचनाही लांडे यांनी दिली आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button