breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

काकडा आरती कार्तिक स्नान सोहळ्याला परवानगी द्यावी, वारकरी मंडळाची पोलिसांकडे मागणी

पिंपरी / महाईन्यूज

कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे वारकरी संप्रदायातील वारक-यांवर सुध्दा भक्तीभावाने पूजन, पठण करण्यावर निर्बंध आले. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत असून वारकरी काकडा आरती कार्तिक स्नान सोहळा 31 ऑक्टोबर 2020 पासून सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र वारकरी महामंडळाने केली आहे.

यासंदर्भात महामंडळाच्या वारकरी भक्तांनी सहपोलिस आयुक्त सुधीर हिरेमठ यांना आज निवेदन दिले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, वारकरी काकडा आरती कार्तिक स्नान सोहळा २०२० 31 ऑक्टोबर पासून सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी. सोशल डिस्टंसिंगचे पूर्णपणे पालन करूनच काकड आरती सोहळा घेतला जाईल, असे वारकरी मंडळांने म्हटले आहे.

तसेच, तहसिलदार गीता गायकवाड यांना देखील वारकरी संप्रदायाचे पुणे जिल्हा अध्यक्ष हभप सतिश महाराज काळजे, पुणे महानगर अध्यक्ष हभप चंद्रकांत महाराज वांजळे, पिंपरी-चिंचवड अध्यक्ष विजय जगताप, पिंपळे सौदागर भजनी मंडळ अध्यक्ष हभप संजय भिसे, पश्चिम महाराष्ट्र वारकरी अध्यक्ष जीवन खाणेकर, पिंपरी-चिंचवड ब प्रभाग अध्यक्ष हभप सुरेश भोईर, संतसेवक हभप वसंत कलाटे, माजी नगरसेवक जयंत बागल, हभप जालिंदर काळोखे, हभप धोडिंबा भोंडवे, हभप विकास काटे, हभप विजय गायकवाड, हभप कैलास काताळे व पंचक्रोशीतील वारकरी मंडळी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button