breaking-newsमुंबई

कशेडी घाटात दरड कोसळली,मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक ठप्पच

मुंबई – गोवा महामार्गावर धामणदेवी गावाजवळ रात्री ८ वाजता कोसळली दरड होती. या दरडीचा जवळपास २०० मीटर लांब रस्त्यावर मातीचा ढिगारा आला आहे. त्यामुळे ही दरड बाजुला करण्यास उशीर होत आहे. एक जेसीबी आणि एका पोकलेनच्या सहाय्याने दरड हटविण्याचे काम सुरू आहे. मात्र, आज सकाळपर्यंत दरड हटविण्याचे काम सुरु असल्याने मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक अद्यापही ठप्पच आहे.

घटनास्थळी पोलादपूर पोलीस आणि एल अँड टीची टीम पोहोचली आहे. दरड रस्त्यावरुन बाजुला करण्याचे काम पूर्ण व्हायला किमान १० तास लागण्याची शक्यता आपत्ती व्यवस्थापन विभागाने माहिती देताना सांगितले. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक जवळपास १० तास ठप्पच आहे. दरम्यान, वाहतूक म्हाप्रळ आंबेत मार्गे वळवण्यात आली आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button