breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
कच-यात फेकलेले दागिने महिलेला परत देणा-या सफाई कर्मचा-याचा सत्कार
पिंपरी / महाईन्यूज
पिंपळे गुरव येथील महिलेने कच-यासोबत पिशवी घंटागाडीमध्ये टाकली होती. पिशवीमध्ये सोन्याचांदीचे दागिने होते. ही गोष्ट एकाने आरोग्य कर्मचारी हेमंत लखन यांना समजली. त्यांनी मोशी कचरा यार्डामध्ये पिशवी शोधून काढली. सोन्याचांदीचे दागिने पिशवीसह संबंधित महिलेला सुपूर्द केले. त्यांच्या प्रामाणिक कार्यामुळे महिलेला दागिने परत मिळाले.
लखन यांच्या प्रामाणिकपणामुळे दापोडीचे राष्ट्रवादीचे नगरसेवक राजू बनसोडे आणि पिंपरी युवा सेनेचे विभागसंघटक निलेश हाके यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी आरोग्य अधिकारी भोसले, अजय जाधव, आनंद कांबळे, मोसीन शेख, सुरज शिंगोटे उपस्थित होते.