breaking-newsराष्ट्रिय

एक कॉल अन् ‘ऑपरेशन लोटस’ फ्लॉप; भाजपाला जोरदार धक्का

भोपाळ | महाईन्यूज

मध्य प्रदेशातभाजपाचं ऑपरेशन लोटस अयशस्वी ठरलं आहे. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीआधीच काँग्रेस सरकार पाडण्याची योजना फसली आहे. कमलनाथ सरकारवर नाराज असलेले सहा आमदार माघारी परतले आहेत. तर ४ आमदार अजूनही बेपत्ता आहेत. राज्यातलं सरकार सुरक्षित असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. भाजपाचं ऑपरेशन लोटस एका आमदाराच्या गनमॅनमुळे फसलं आहे. सर्व काही योजनेनुसार सुरू असताना गनमॅननं केलेल्या एका फोनमुळे ऑपरेशन लोटस अपयशी ठरलं आहे. काँग्रेस आघाडीतल्या काही नाराज आमदारांना मंगळवारी रात्री चार्टर्ड विमानानं दिल्लीला नेण्यात आलं. आमदार दिल्लीला रवाना होत असताना एका गनमॅननं फोन केला. याच कॉलमुळे आमदार दिल्लीत एकत्र थांबणार असल्याची माहिती फुटली. त्यामुळे काँग्रेसला बराच अवधी मिळाला. यानंतर काँग्रेसचे मंत्री जीतू पटवारी आणि जयवर्धन सिंह तातडीनं दिल्लीला रवाना झाले. राज्य सरकारला पाठिंबा देणारे काँग्रेस आघाडीतले १२ आमदार मंगळवारी दिल्लीत पोहोचणं अपेक्षित होतं. यापैकी १० आमदार दिल्लीत पोहोचलेदेखील होते.

काँग्रेस आघाडीतले आमदार बुधवारी भाजपाच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी घेणार होते. १० आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यास राज्यसभेच्या निवडणुकीपूर्वीच कमलनाथ यांचं सरकार कोसळेल, अशी योजना होती. दिल्लीत दोन, तर बंगळुरुत एका ठिकाणी या आमदारांना थांबवण्यात येणार होतं. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे पुत्र विजयेंद्र यांच्याकडे आमदारांच्या बंगळुरू मुक्कामाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. भाजपाकडून आमदार फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा सुगावा लागताच काँग्रेसनं त्यांच्या ११४ आमदारांना व्हिप बजावला. कोणत्याही आमदारानं पक्षाचा व्हिप अमान्य केल्यास त्याचं विधानसभेतलं सदस्यत्व रद्द होईल, असं संसदीय कार्यमंत्री गोविंद सिंह यांनी व्हिप जारी करताना म्हटलं होतं. राज्यसभेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाल्यास त्याची किंमत संबंधित आमदाराला चुकवावी लागेल, असा इशाराच सिंह यांनी दिला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button