breaking-newsमहाराष्ट्रराष्ट्रिय

उस्मानाबादमध्ये आंदोलनकर्त्यांकडून जाळपोळ

उस्मानाबाद – मराठा आरक्षणावरून मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप उसळल्याने उस्मानाबाद शहरात आंदोलनकर्त्यांनी जाळपोळ केली.

ख्वाजानगर, गणेशनगर भागात रस्त्यावर वाहनांचे टायर जाळण्यात आले. सर्वत्र वातावरण संतापजनक असल्यामुळे बंदला चांगलाच प्रतिसाद मिळाला. ज्ञानेश्वर मंदिरासमोरील दुकानांवर जमावाकडून दगडफेक करण्यात आली. तर, ख्वाजानगर भागात देखील जमावाने दगडफेक केल्याने वातावरण चिघळले होते.

दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी ठिय्या मांडला होता. जिल्हाधिकारी, तहसिलदार यांच्या नावाने आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी केली. दरम्यान, एसटी बस स्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय ते सेंटर बिल्डींग पर्यंत सन्नाटा पसरला होता. दुकाने बंद होती. सकाळी बस स्थानक परिसरातील दुकानांवर दगडफेक झाल्याने दुकाने बंद ठेवण्यात आली. संपूर्ण शहरात कडकडीत बंद ठेवण्यात आला.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button