breaking-newsक्रिडा

इंडोनेशियाचे पदक विजेते खेळाडू बक्षिसाची रक्कम भूंकपग्रस्तांना दान देणार

इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई खेळांआधी लोंबाक बेटांवर भूकंपाचे तीव्र धक्के बसले होते. या भूकंपात इंडोनेशियामध्ये मोठी वित्त आणि मनुष्यहानी झाली. ५०० लोकांना आपले प्राण गमवावे लागले तर जवळपास १० हजार लोकांना बेघर व्हावं लागलं. या घटनेनंतर आशियाई स्पर्धांमध्ये पदकाची कमाई करणाऱ्या इंडोनेशियन खेळाडूंनी आपल्या बक्षिसाची रक्कम भूकंपग्रस्तांना दिली आहे.

बॅडमिंटनमध्ये पुरुषांमध्ये विजेतेपद मिळवणारा खेळाडू जोनाथन ख्रिस्ती आपल्या कमाईतली काही रक्कम आपल्या भूकंपग्रस्तांना देणार आहे. सध्या मी मिळवलेल्या बक्षिसाची रक्कम ही भूकंपग्रस्तांच्या अधिक मदतीला येणार आहे. त्यामुळे माझ्या बक्षिसातला काही भाग मी दान करण्याचं ठरवलं असल्याचं, जोनाथन म्हणाला. पर्यटकांच्या दृष्टीने महत्वाचं ठिकाण असलेल्या लोंबाक बेटांवर भूकंपामुळे अंदाजे ५० कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.

दरम्यान पुरुष बॅडमिंटन दुहेरी स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या इंडोनेशियाच्या बॅडमिंटनपटूंनी आपल्या जर्सी आणि बॅडमिंटन रॅकेटचा लिलाव करण्याचं ठरवलं आहे. यातून मिळणारी रक्कम हे भूकंपग्रस्त भागात मदतकार्यासाठी दिला जाणार आहे. इंडोनेशियाच्या खेळाडूंनी घेतलेल्या या निर्णयाचं सोशल मीडियावर कौतुक होतं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button