breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

आपल्या त्वचेसाठी सकाळ असावी नेहमी हेल्दी…काय कराव त्यासाठी पहा…

सकाळी उठल्यानंतर आपला चेहरा थंड पाण्याने धुणे. थंड पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचेवरील पोअर्स बंद होतात. थंड पाणी आपल्या चेहऱ्यासाठी अँटी रिंकल एजेंटच्या स्वरुपातही कार्य करते. यामुळे त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यास मदत मिळते आणि त्वचा सैल देखील होत नाही. सूर्याच्या हानिकारक किरणांपासूनही आपल्या त्वचेचे संरक्षण होते. सकाळी थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुतल्यास चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होण्यास मदत मिळते.

सकाळी उठल्यानंतर त्वचेला चांगल्या पद्धतीने स्वच्छ, टोन आणि मॉइश्चराइझ करावं. गुलाब पाणी हे एक चांगले आणि नैसर्गिक स्वरुपातील टोनर मानले जाते. गुलाब पाण्यामुळे चेहऱ्यावरील ओपन पोअर्स बंद करण्यासाठी आणि त्वचा फ्रेश राहण्यासाठी मदत मिळते. टोनर लावल्यानंतर आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार त्यावर मॉइश्चराइझर लावावं.

आपले शरीर आणि त्वचा हायड्रेट राहण्यासाठी सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी द्रवयुक्त पदार्थांचे सेवन करावे. त्वचा हायड्रेट राहण्यासाठी शरीर डिटॉक्स होणं गरजेचं आहे. शरीर नैसर्गिक पद्धतीने डिटॉक्स केल्यास त्वचेवर चमक येण्यास मदत मिळते. यासाठी दिवसभर भरपूर प्रमाणात पाणी प्यावे. आहार तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतरच ग्रीन टी आणि नारळ पाणी प्यावे.

ग्लिसरीनचा वापर आपण नॅचलर सीरम म्हणूनही वापरू शकतो. गुलाब पाणी, लिंबू रस एकत्र करून आणि यामध्ये ग्लिसरीन मिक्स करून . हे मिश्रण सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावर लावावे. चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर आपला संपूर्ण चेहरा आणि मानेवर हे नॅचलर सीरम लावावे. ग्लिसरीन आपल्या चेहऱ्यासाठी क्लींझरच्या स्वरुपात काम करते. यामुळे चेहऱ्यावर जमा झालेली अतिरिक्त दुर्गंध आणि तेल स्वच्छ होते. ग्लिसरीनमध्ये मॉइस्चराइझिंग चे गुणधर्म आहेत. यामुळे चेहऱ्याचा कोरडेपणा कमी होतो आणि त्वचा टोन होण्यासह मदत मिळते.ज्यांची त्वचा संवेदनशील आहे अशांनी या मिश्रणात लिंबाचा रस मिक्स न करता फक्त गुलाब पाणी आणि ग्लिसरीन एकत्रित करून लावलं तरी चालेलं.

मुलतानी मातीला आयुर्वेदिक उपचारांमध्ये भरपूर महत्त्व आहे. आयुर्वेदिक उपचार म्हणून त्वचेवर मुलतानी माती लावण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. सकाळच्या सुमारास चेहरा स्वच्छ धुऊन तुम्ही मुलतानी मातीचा फेस पॅक लावू शकता. मुलतानी मातीतील औषधी गुणधर्मामुळे चेहऱ्यावरील सर्व प्रकारची दुर्गंध, धूळ, मातीचे कण स्वच्छ होण्यास मदत मिळेल. शिवाय चेहऱ्याचा रंग आणि पोत देखील चांगला राहण्यास मदत मिळेल. या मातीमुळे चेहऱ्यावरील ब्लॅक हेड्स देखील कमी होतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button