breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

आदित्य ठाकरेंनी भरला वरळीतून उमेदवारी अर्ज

मुंबई – युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी दुपारी वरळी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी निवडणूक कार्यालयाबाहेर शिवसेनेकडून मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. आदित्य ठाकरे यांनी पदयात्राही काढली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून आपल्याला शुभेच्छा दिल्या आहेत, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. आदित्य ठाकरे यांच्यासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली. त्या सर्वांचे आभार मानतो, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता मनसेचेही आभार मानले आहेत. मनसेने या मतदारसंघात उमेदवार दिलेला नाही. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button