‘अाम्ही काय वाचायचं हे तुम्ही नाही सांगायचं’ असं म्हणत विद्यार्थ्यांचा विद्यापीठात माेर्चा
पिंपरी ( महा ई न्यूज ) – ‘अाम्ही काय वाचायचं’ ‘हे तुम्ही नाही सांगायचं’ असं म्हणत फुले, शाहू, अांबेडकर कृती समितीच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात माेर्चा काढण्यात अाला. यावेळी विद्यार्थ्यांसह, माजी न्यायमूर्ती बी. जी. काेळसे पाटील, कम्युनिस्ट पक्षाच्या किरण माेघे अादी उपस्थित हाेते.
संविधान दिनी 26 नाेव्हेंबर राेजी हरिती प्रकाशनाकडून विद्यापीठाच्या अनिकेत कॅंन्टिन जवळ पुस्तकांचा स्टाॅल लावण्यात अाला हाेता. या स्टाॅलवर महापुरुषांवर लिहीण्यात अालेली विविध पुस्तके हाेती. या स्टाॅलवर अाक्षेप घेत शहरी नक्षलवादाचे समर्थन करणारी पुस्तके विकत असल्याचा अाराेप अभाविपकडून करण्यात अाला. त्याचबराेबर हरिती प्रकाशनाच्या लाेकांना धक्काबुक्की देखिल करण्यात अाली. यामुळे विद्यापीठात तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते. या घटनेचा निषेध म्हणून अाज विद्यापीठातील अांबेडकर पुतळ्यापासून अनिकेत कॅंन्टिनपर्यंत माेर्चा काढण्यात अाला. या माेर्चात विविध घाेषणा देण्यात अाल्या. तसेच लाेकशाही व संविधानाचा जयजयकार करण्यात अाला.