breaking-newsआंतरराष्टीय

अमेरिकेचे नौदल प्रमुख स्पेन्सर यांची हकालपट्टी

नेव्हीसील (नौसैनिक) प्रकरण योग्य प्रकारे न हाताळल्याने लष्करी अधिकारी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात असल्याचे चित्र निर्माण झाले असा आरोप करून अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क एस्पर यांनी नौदल प्रमुख रिचर्ड स्पेन्सर यांना पदावरून काढून टाकले.

इराकमध्ये एडवर्ड गॅलघर या नेव्ही सीलने २०१७ मध्ये इराकमध्ये प्रेताबरोबर स्वत:चे छायाचित्र काढले होते त्या प्रकरणात त्याची पदावनती करण्यात आली, पण नंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या नौदल सीलला ( नौसैनिक) परत पूर्वीच्या पदावर आणले होते.

ट्रम्प यांनी या प्रकरणात नौसैनिक असलेल्या गॅलघर याला १५ नोव्हेंबर रोजी माफी दिली होती. त्यानंतर लष्करी अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली होती. युद्धकाळात गुन्हे करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांना माफ करण्याची ट्रम्प यांची कृती योग्य नव्हती असे त्यांचे लष्करातील काहींचे म्हणणे होते.

एस्पर यांनी रविवारी असे म्हटले होते की, नौदल प्रमुख स्पेन्सर यांनी हा वाद गोपनीय पद्धतीने मिटवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांनी विश्वास गमावला आहे. संरक्षण खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने असे वर्तन करणे योग्य नव्हते. त्यामुळे स्पेन्सर यांना आपण पदावरू न काढून टाकत आहोत.

पेंटॅगॉनचे प्रवक्ते जोनाथन हॉफमन यांनी सांगितले की, संरक्षण मंत्र्यांनी स्पेन्सर यांच्या राजीनाम्याची मागणी विश्वास गमावल्यानंतर केली होती. एस्पर व संरक्षण दलांचे संयुक्त प्रमुख मार्क मिली यांनी शुक्रवारी गॅलघर यांच्या प्रकरणात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा केली होती. स्पेन्सर यांनी खासगी पातळीवर गुपचूप व्हाइट हाऊसकडे प्रस्ताव मांडून गॅलघर यांची श्रेणी कायम ठेवून त्यांना ट्रायडंट पीन हा  सन्मान माघारी न घेता निवृत्त होण्याची मुभा दिली. नौदलाने नौसैनिक एडी गॅलघर याची सुनावणी ज्या पद्धतीने केली ते पटलेले नाही असे संरक्षण मंत्री एस्पर यांनी म्हटले आहे. स्पेन्सर यांच्या जागी नौदल प्रमुख म्हणून नॉर्वेतील राजदूत व अ‍ॅडमिरल केनिथ  ब्रेथवाइट यांची नेमणूक करण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button