Uncategorizedमनोरंजन

अमिताभ बच्चन यांचे हस्ताक्षर जुहीला वाचता येईना

बॉलिवूडचे कलाकार हिंदी माध्यमामध्ये काम करतात. मात्र त्यांना हिंदी बोलायला आवडत नाही. कित्येकांना तर धड हिंदी वाचताही येत नाही. हिंदी लिहीण्याची तर बातच खूप दूरची आहे. कित्येक कलाकारांना रोमन लिपीत लिहीलेले हिंदी वाचायची सवय लागलेली आहे. त्यांचे संवादही असेच रोमन लिपीत लिहून दिलेले असतात.

अलिकडेच बिग बी अमिताभ बच्चन यांनी लिहीलेले एक हिंदी पत्र जुही चावलाला वाचायला दिले होते. जुहीने दिलेल्या आंब्याच्या पेटीबाबत बच्चन यांनी तिला धन्यवाद देण्यासाठी हे पत्र लिहीले होते. पण जुहीला ते पत्र वाचताच आले नाही. तिने या पत्राचा फोटो ट्‌विटरवर पोस्ट केला. “अमितजी तुम्ही खूप छान लिहीले आहे. मात्र या पत्रात लिहीले काय आहे.’ अशी कॅप्शनही तिने या फोटोला जोडली.

Juhi Chawla

@iam_juhi

Amit ji 🙏🙏🙏😂😂😂🤣🤣… this is beeauuttiiffullllly written ..🌟🌟🌟💕💕I love it 💕💕💕…. ..???🤓..???? par kya likha hai …..😛 @SrBachchan

एकतर बच्चन यांचे पत्र वाचता आले नाही. उलट ट्विटरवर अभिमानाने सांगते आहे की बच्चन यांच्या पत्रात काय लिहीले आहे, ते त्यांनी सांगावे. बिचारे अमिताभ बच्चन. आपले हस्ताक्षर वाईट आहे की जुहीला हिंदीत पत्र पाठवून चूक केली असे आता त्यांना वाटत असेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button