breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अमराठी भाषिकांना देणार मराठीचे धडे – सभापती तुषार हिंगे

  • मराठी भाषा संवर्धन समितीचा निर्णय

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरात मराठी भाषा येत नसलेल्या अमराठी भाषिकांना महापालिका खासगी संस्थेच्या मदतीने मराठीचे धडे गिरविणार आहे. चसा निर्णय पिंपरी-चिंचवड मराठी भाषा संवर्धन समितीच्या बैठकीत मंगळवारी (दि.16) घेण्यात आला आहे, अशी माहिती क्रीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती तुषार हिंगे यांनी दिली.

समितीचे अध्यक्ष महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व सभापती तुषार हिंगे यांच्या उपस्थितीत मराठी भाषा संवर्धन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. त्यानुसार शहरात इतर राज्यातून आलेले असंख्य नागरिक वास्तव्य करतात. त्यांना मराठी शिकण्याची आवडही असते. मात्र, त्यांना तशी सुविधा उपलब्ध होत नाही. त्यातून त्यांची अडचण होते आणि मराठीचाही वापर होत नाही. त्यासाठी अमराठी भाषिकांना मराठी भाषा शिकविण्याबाबत चर्चा झाली.

चिंचवड येथील प्रतिभा विद्यालयाने अमराठी भाषिकांना मराठी भाषा शिकविण्याचे वर्ग घेण्याची तयारी दर्शविली आहे. तेथेच हे वर्ग मोफत विद्यालयाकडून घेतले जातील. त्यामुळे तेथे मराठी भाषेचे वर्ग सुरू करण्याच पालिकेने सहमती दर्शविली आहे. या व्यतिरिक्त शहरात पहिले ते बारावीपर्यंत मराठी भाषा सक्तीची करणे आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळिवा हे दोन्ही ठराव करून शासनाकडे पाठविण्यात यावेत. तसेच, मराठी जागृतीसाठी पालक व शिक्षक सभा घेण्यात याव्यात, असेही सुचविण्यात आले आहे. या व्यतिरिक्त मराठीसाठी कथाकथन, काव्यवाचन, घोषावाक्य असे विविध उपक्रम, स्पर्धा घेण्याचे नियोजन असल्याचेही हिंगे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button