breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अबब..महापालिकेचा पावणे दोन कोटीचा डीडी तीन वर्षे होता धूळखात

चूक नेमकी कोणाची..संबंधित अधिका-याची की बँक ऑफ बडोदाची.. कारवाई होणार का?

विकास शिंदे

पिंपरी |महाईन्यूज |प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्रीशामक विभागातील ना हरकत प्रमाणपत्रासाठी एका बांधकाम व्यावसायिकाने तब्बल एक कोटी 75 लाख 55 हजार 100 रुपयाचा डीडी बँक ऑफ बडोदा पीसीएमसी शाखेकडे सादर केला. मात्र तो डीडी चार-पाच दिवसात मनपा बॅंक खात्यात जमा होणे अपेक्षित होते. परंतू, सदरील लेखा विभागासह बॅंक अधिका-यांच्या दुर्लक्षामुळे तब्बल तीन वर्ष धूळखात पडला होता. ही रक्कम वेळीच जमा न झाल्याने महापालिकेचे आर्थिक नूकसान झाले आहे.

महापालिकेच्या अग्निशामक विभागाकडे व्यावसायिक इमारत बांधकामाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अग्निशमन शुल्क आकारले जाते. त्या शुल्का पोटी किवळे येथील बांधकाम व्यावसायिकाला रु १ कोटी ७५ लाख ५५ हजार १०० रुपये भरण्यास सांगितले. त्या व्यावसायिकाने कोटक महिंद्र बँकेचा डीडी नं. १९८४९० हा १२ सप्टेंबर २०१४ रोजी मनपाच्या नागरी सुविधा केंद्राने बँक ऑफ बडोदा, पीसीएमसी शाखेत जमा केली. प्रत्यक्षात सदरील रक्कम चार पाच दिवसात मनपाच्या खात्यात जमा होणे अपेक्षित होते. मात्र, सदरील रक्कम मनपा खात्यात तब्बल तीन वर्षांनंतर जमा झाली आहे. हा विषय अतिशय गंभीर असून संबंधित अधिका-यांच्या दुर्लक्षामुळे मनपाचे आर्थिक नूकसान झाले आहे.

दरम्यान, सदरील रक्कम बँक ऑफ बडोदा मनपाच्या खात्यात जमा होण्यास विलंब करण्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. डीडी संबंधीची वैधता तीन महिने असतानाही तीन वर्ष एवढा कालावधीने जमा झाला आहे. त्यामुळे या प्रकरणी लेखा व अग्रीशमन विभागातील संबंधितावर या प्रकरणी योग्य ती चाैकशी करुन संबंधितावर कडक कारवाई करावी, अशी मागणी होवू लागली आहे.

बॅंकेकडे स्मरणपत्र देवून पाठपुरावा सुरु..

लेखा विभागाने बॅंकेला 11 नोव्हेंबर 2017 मध्ये लेखी पत्र देवून विलंब झालेल्या कालावधीचे अंदाजे व्याज 9 टक्के (चक्र व्याजासह) आठ दिवसात जमा करावे, असे कळविले आहे. त्यावर बॅंकेने मनपाकडे 20 लाख 62 हजार 712 रुपये जमा केले. परंतू मुख्य लेखा परिक्षकांकडून सदरील बॅंकेकडून 18 टक्के दराने व्याजदर वसूल करावे, असे सुचविले आहे. त्यानूसार बॅंकेकडे 1 कोटी 5 लाख 76 हजार 960 रुपये ही उर्वरीत रक्कम जमा करण्याबाबत बॅंकेकडे पाठपुरावा सुरु असून त्यांना स्मरणे पत्र देखील दिले आहे. – जितेंद्र कोंळबे – मुख्य लेखा व वित्त अधिकारी, महापालिका

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button