breaking-newsआंतरराष्टीय

अफगाणिस्तानात तालिबानींकडून 16 जवान ठार

13 इंजिनीयर आणि 20 गार्डसचे अपहरण 
काबुल्‌ (अफगाणिस्तान) – तालिबानींनी अफगाणिस्तानात 16 पोलीसांना ठार केले आहे. त्याचबरोबर एका कंपनीच्या 13 इंजिनीयर्स आणि 20 गार्डसचे अपहरण केले आहे. शुक्रवारी दहशतावाद्यांनी केलेला संघर्ष विराम संपताच तालिबानींनी दहशतवादी कारवाया सुरू केल्या. बदघिस प्रांतात कमीत कमी 16 पोलीसांची अणि दोन नागरिकांची हत्या केली. त्याशिवाय सडक निर्माण करणाऱ्या एका खासगी कंपनीचे 13 इंजिनीयर्स आणि 20 गार्डांचे अपहरण केले. तालिबानींनी आपल्या कारवाया गुरुवारीच सुरू करणार असल्याचे जाहीर केले होते. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांची युद्धविरामाची मुदत वाढवण्याची विनंती तालिबानने फेटाळून लावली.

युद्धविराम रविवारपर्यंत चालू ठेवावा असे अशरफ गनी यांनी सुचवले होते. पण तालिबानने गुरुवारपासूनच दहशतवादी कारवाय सुरू केल्या. बुधवारी तालिबानींनी याच भागात एका एका लष्करी ठाण्यावर हल्ला करून 30 सैनिकांची हत्या केली होती. बदघिस प्रांतातील सुरक्षा दलांच्या आठ ठाण्यांवर ताबा मिळ्वण्यासाठी तालिबानची कारवाई चालू केली असून दोन ठाण्यांवर ताब मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत,, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button