breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर पिंपरीतले जावेद शेख यांचाही नगरसेवक पदाचा राजीनामा

पिंपरी, महाईन्यूज, प्रतिनिधी

राज्यातील बरबटलेल्या राजकारणाला वैतागून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आज पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे.

सत्ताधारी भाजपचे सरकार सुडाचे राजकारण करत आहे. विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न करत आहे. तांत्रीक घोटाळे करून सत्ताधिश होण्यासाठी वाट्टेल ते करण्यापर्यंत मजल जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना कारण नसताना ईडीच्या कारवाईला सामोरे जाण्याची परिस्थिती निर्माण करत आहे. त्याला वैतागून माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी काल सायंकाळी विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा दिला. तो बागडे यांनी मंजुरही केला.

मात्र, अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे नगरसेवक, कार्यकर्त्यांमध्येही वातावरण तापले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नगरसेवक जावेद शेख यांनी सुध्दा नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी तो राजीनामा स्वीकारला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button