breaking-newsराष्ट्रिय
सलग बाराव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ

नवी दिल्ली : देशभरात इंधन दरवाढीवरुन संताप पसरलेला असताना कर्नाटक निवडणुकीनंतर आज सलग बाराव्या दिवशी पेट्रोल व डिझेलचे दरांमध्ये वाढ झाली आहे. आज पेट्रोलचे दर ३६ पैशांनी तर डिझेलचे दर २२ पैशांनी वाढले आहेत.
मुंबईमध्ये आज पेट्रोल प्रतिलिटर ८५ रुपये ६५ पैशांनी मिळत आहे तर डिझेल प्रतिलिटर ७३ रुपये २० पैसे एवढ्या दरात उपलब्ध आहे. देशात सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रातील जनतेला घ्यावे लागते. देशात सर्वात महाग पेट्रोल-डिझेल अमरावतीत आहे. पेट्रोल ८६ .५२ रुपये तर डिझेल ७४.११ रुपये प्रतिलिटर आहे.