breaking-newsराष्ट्रिय

सलग दुसऱ्या वर्षी कांद्याचे भाव पडल्याने गुजरातमधील शेतकरी अडचणीत

अहमदाबाद : सलग दुसऱ्या वर्षी कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या आहेत. सध्या अहमदाबाद कृषि उत्पन्न बाजार समिती येथे कांदा ३.५ ते ८ रु./किलो या प्रमाणे विकला जात आहे. तर किरकोळ बाजारात कांद्याचे भाव २०-२५ रु./किलो आहेत.

गुजरातमधील कांद्याचे सर्वांत मोठे व्यापारी केंद्र असलेल्या महुवा कृषि उत्पन्न बाजार समिती येथे कांदा ६.५ ते १५ रु./किलोप्रमाणे विकला जात आहे. तर गावातील नागरिकांना कांदा फुकट देण्याबाबत शेतकऱ्यांवर दबाव आणला जात आहे.

लागवडीचा खर्च सोडून मजुरी खर्च लक्षात घेतला, तर शेतकऱ्यांना साधारणपणे २ रु./किलो याप्रमाणे खर्च लागतो. तर गोणपाटाच्या पिशव्या घेण्याचा खर्च वेगळाच. ही एक पिशवी साधारणपणे ३० रुपयांना मिळते (प्रत्येक पिशवी ५० किलोग्राम क्षमतेची). तर शेतकऱ्यांना त्याचे उत्पादन महुवा येथील बाजारात आणण्यासाठी ४ रु./किलो याप्रमाणे वाहतूक खर्च लागतो.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button