breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
रोटोमॅकच्या प्रवर्तकांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली – बॅंक ऑफ बडोदाला कर्जाच्या रूपाने 456 कोटी रूपयांचा गंडा घातल्याबद्दल सीबीआयने रोटोमॅक ग्लोबल प्रा.लि. आणि त्या कंपनीच्या प्रवर्तकांविरोधात आरोपपत्र दाखल केले. आरोपपत्र दाखल झालेल्या रोटोमॅकच्या प्रवर्तकांमध्ये कंपनीचा सीएमडी विक्रम कोठारी आणि त्याचा मुलगा राहुल कोठारी यांचा समावेश आहे.
बॅंकेच्या काही माजी अधिकाऱ्यांनाही आरोपी करण्यात आले आहे. कानपूरस्थित रोटोमॅक कंपनीने कर्जाच्या रूपाने सात बॅंकांना तब्बल 3 हजार 690 कोटी रूपयांचा चुना लावला. इतर बॅंकांच्या फसवणुकीशी संबंधित प्रकरणांची चौकशी अजून सुरू आहे. कोठारी पिता-पुत्राला याआधीच अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. बॅंक ऑफ बडोदाने केलेल्या तक्रारीनंतर सीबीआयने याप्रकरणी तपास हाती घेतला.