मृत्युनंतर दफन नको, मी देहदान करणार – तस्लीमा नसरीन

नवी दिल्ली – आपल्या सडेतोड वक्तव्यांमुळे सदैव चर्चेत राहणारी बांगला देशाची प्रसिद्ध लेखिका तस्लीमा नसरीन ही पुन्हा एकदा चर्चेत आह्ये. मात्र यावेळी वेगळ्या कारणासाठी, आपल्या मृत्यूनंतर देहदान करण्याचा निर्णय तस्लीमाने जाहीर केला आहे. एम्सच्या ऍनॉटॉमी (शरीररचना शास्त्र) विभागाच्या डोनर स्लिपसह तस्लीमा नसरीनने ट्विटरवर जाहीर केले अहे, की मृत्यूनंतर मा वैद्यकीय संशोधनासाठी देहदान करण्याचा निर्णय घेतला आहे. मृत्युनंतर माझ्या मृतदेहाचे दफन करण्यात येऊ नये.
तस्लीमा नसरीनच्या या निर्णयाची मोठ्या प्रमाणावर प्रशंसा होत आहे. 1952 साली बांगला देशात जन्मलेली तस्लीमा नसरीन पेशाने डॉक्टर आहे. तिने लिहिलेली अनेक पुस्तके गाजली आहेत. लज्जा या कदंबरीने तिला आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळवून दिली. स्त्रीत्व आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मोकळेपणाने लिहिणारी तस्लीमा कट्टरपंथीयांच्या निशाण्यावर होती. लज्जा कादंबरीमुळेच कट्टरपंथीयांनी तिची हत्या करण्यासाठी इनाम जाहीर केले होते. त्यानंतर ती बांगला देश सोडून स्वीडनला गेला. सन अ2005 मध्ये ती भारतात आली आणि तेव्हापासून भारतातच राहत आहे.