breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त

मुंबई – महसूल गुप्तचर संचलनालयाने पालघर येथील एका फॅक्‍टरीमधून मोठ्या प्रमाणावर “ट्रामाडोल’ नावाच्या औषधी पदार्थाचा साठा जप्त केला आहे. “ट्रामाडोल’ हा वेदनाशामक पदार्थ मानसिक व्याधींवरील औषधांमध्ये वापरला जातो. जगभरात अंमली पदार्थांचे व्यसन असलेल्यांकडून “ट्रामाडोल’चा वापर होत असतो. जप्त केलेल्या “ट्रामाडोल’ची किंमत कोट्यधी रुपये असल्याचे समजते आहे.

भारतामध्ये “ट्रामाडोल’चा समावेश अमली औषधांच्या यादीमध्ये नुकताच करण्यात आला आहे. ग्वाल्हेरमधील “सेंट्रल ब्युरो ऑफ नारकोटिक्‍स’ च्या संमतीशिवाय”ट्रामाडोल’चे उत्पादन आणि विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे महसूली गुप्तचर विभागाने केलेल्या तपासणीमध्ये ट्रामाडोलच्या गोळ्या आणि ट्रामाडोल पावडरीचे साठे पालघरमधील फॅक्‍टरीमध्ये आढळून आले, असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

याशिवाय रत्नागिरीतील द्रोणागिरी येथील गोदामावरही छापा घालण्यात आला. तेथे ट्रामाडोलची 959 खोकी आढळून आली. त्यामध्ये ट्रामाडोलच्या 4 कोटी, 48 लाख, 68 हजार गोळ्यांचा साठा आढळून आला. या दोन्ही ठिकाणी मिळून तब्बल 6 कोटी, 11 लाख, 48 हजार गोळ्या आणि 56 किलो वजनाची पावडर जप्त करण्यात आली आहे. या गोळ्या औषधी पदार्थ म्हणून विक्रीचा प्रयत्नही झाला होता.

फॅक्‍टरीचा मालक आणि केमिस्टनी या प्रकरणातील आपला सहभाग कबूल केला आहे. या अमली औषधाच्या बेकायदेशीर उत्पादनाची ऑर्डर देणाऱ्या मध्यस्थालाही पकडण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button