breaking-newsपिंपरी / चिंचवड
भाजप सरकारला चार वर्षे पुर्ण झाल्याने शहर युवा मोर्चाची मोटार सायकल रॅली

चिंचवड – केंद्रातील भाजपच्या एनडीए सरकारला चार वर्षे पुर्ण झाल्याने पिंपरी-चिंचवडमधील भाजप युवा मोर्चाच्या वतीने मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
चिंचवडच्या क्रांतीवीर चापेकर चौकातून भाजप युवा मोर्चाच्या रॅलीस सुरुवात झाली. तर भोसरीतील अंकुशराव लांडगे सभागृहात रॅलीचा समारोप करण्यात आला. चापेकराच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन रॅलीचे उद्घाटन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजप प्रदेशच्या सरचिटणीस उमा खापरे, स्विकृत सदस्य विठ्ठल भोईर, वैशाली खाडये, नगरसेवक राजेंद्र गावडे, रवी लांडगे, राजेश पिल्ले आदी उपस्थित होते.