breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

धोनीने लगावला आयपीएल १० मधील सर्वात उंच सिक्स

मुंबई : रायजिंग पुणे सुपरजाएंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्यामध्ये लोकांचे पैसे वसूल झाले. धोनीने आयपीएल सीजन १० मधला सर्वात मोठा सिक्स या मॅचमध्ये लगावला.

धोनीने अजूनपर्यंत कोणतीही मोठी खेळी या सीजनमध्ये केलेली नाही. पण त्यांच्या या सामन्यामधील सिक्सने बॉलच हरवला. १४ व्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवर एका लेग स्पिनवर धोनीने हा जबरदस्त शॉट लगावला. बॉल स्टेडिअमच्या छतावर जाऊन पडला. हा या सिजनमधला सर्वात उंच सिक्स ठरला आहे.

राइजिंग पुणे सुपरजाएंटकडून महेंद्र सिंह धोनीने बंगळुरु विरोधात २५ बॉलमध्ये २८ रन केले. धोनीने १ फोर आणि ३ सिक्स मारले. धोनी याआधीच्या ४ सामन्यांमध्ये फ्लॉप ठरला. त्याने त्याच्या करिअरमधील एकूण २४ हजार रन देखील पूर्ण केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button