‘ट्रोल’ करणाऱ्यांकडे लढण्याची हिंमत नाही; अजित पवार, पार्थ पवारांमध्ये हिंमत आहे- नवनीत काैर-राणा

लोणावळा – ट्रोल करणा-या विरोधकांमध्ये समोर येऊन लढण्याची हिंमत नसते. असे कोणी कितीही ट्रोल केले तर काही होत नाही. कोणात किती दम आहे. हे दिसणार आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उमेदवार पार्थ पवार यांच्यात दम आहे. म्हणून ते बाहेर पडून प्रचार करीत आहेत. असे अभिनेत्री व अमरावती मतदारसंघातील राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार नवनीत काैर-राणा यांनी सांगितले.
लोणावळा येथे नवनीत काैर-राणा आज (शनिवारी) प्रचारासाठी आल्या होत्या. सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत त्यांनी लोणावळा शहरात पदयात्रा काढून महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांचा प्रचार केला. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, पार्थ पवार उपस्थित होते.
महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार याचे पबमधील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर टाकून त्यांना शिवसैनिकाकडून ट्रोल करण्यात येत आहे.
याबाबत बोलताना नवनीत काैर-राणा म्हणाल्या की, ट्रोल करणा-या विरोधकांमध्ये समोर येऊन लढण्याची हिंमत नसते. असे कोणी कितीही ट्रोल केले तर काही होत नाही. कोणात किती दम आहे. हे दिसणार आहे. पार्थ पवार आणि अजित पवार यांच्यात दम आहे म्हणून ते बाहेर पडून निवडणुक लढवीत आहेत. निवडणुक लढल्यानंतर कळेल की कोणात किती दम आहे. सोशल मीडियावर फोटोंनी ट्रोल करण्याने काहीच होत नाही. लढून लोकांचे मत घेण्यात दम असतो. तो दम मतदानाच्या दिवशी दिसणार आहे.
https://youtu.be/ZpSslgxHyUo