breaking-newsक्रिडा

टीम इंडियाचं जोरदार सेलिब्रेशन, या खेळाडूच्या चेहऱ्यावर फासला केक

विंडीजविरुद्ध झालेल्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने ३-१ असा विजय मिळवला. मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला, पण दुसरा सामना बरोबरीत सुटला आणि तिसरा सामना विंडीजने जिंकला. त्यामुळे मालिका १-१ ने बरोबरीत होती. पण अखेर भारताने शेवटचे २ सामने जिंकले आणि मालिका खिशात घातली.

मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ पुन्हा मैदानावरून हॉटेलकडे परतला. त्यावेळी भारतीय संघाचे हॉटेलमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. विजयाचा केक कापून हा जल्लोष साजरा करण्यात आला. त्यावेळी खेळाडू मजा-मस्तीच्या मूडमध्ये दिसत होते.

हॉटेलच्या लॉबीमध्ये प्रथम मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि पाठोपाठ कर्णधार विराट कोहली आला. पण मनाचा मोठेपणा दाखवत कोहलीने केक कापण्याचा मान रोहित शर्माला दिला. या दरम्यान केदार जाधव केकचा पहिला घास खाण्यासाठी जेव्हा पुढे आला, तेव्हा रोहितने त्याच्या चेहऱ्यावर पूर्ण केक फासला. BCCIने हा गंमतीशीर व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे.

BCCI

@BCCI

Back at the team hotel after an early wrap and it is time to celebrate.🏆

विंडीजबरोबरची कसोटी मालिका आणि एकदिवसीय मालिका भारताने जिंकली. आता या दौऱ्यातील टी२० मालिका रविवारपासून सुरु होणार आहे. यातील पहिला सामना ४ ऑक्टोबर, दुसरा सामना ६ ऑक्टोबर आणि तिसरा सामना दिवाळीनंतर ११ ऑक्टोबरला होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button