Mahaenews

जामा मशिदीच्या इमामांना जेलमध्ये टाकण्याची शिवसेनेची मागणी

Share On

नवी दिल्ली : जामा मशिदचे इमाम बुखारी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफला पत्र लिहून काश्मीरमध्ये हस्तक्षेप करण्याचे आवाहन केलं. यावर शिवसेनेने इमामांवर टीका करत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकण्याची मागणी केली. तसेच काश्मीरमध्ये परिस्थिती चिघळत असतानाही भाजप पीडीपीसोबत सत्तेत का असा सवालही उपस्थित करण्यात आला.बुखारी यांनी पत्र लिहून नवाज शरीफ यांना काश्मीरमध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी हुर्रियत नेत्यांशी चर्चा करण्याची मागणी केली होती. पण या पत्रावरुन वाद तयार झाला.

Exit mobile version