breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
चिखली येथील आठ गोदामांना पुन्हा भीषण आग (व्हिडिओ)

चिखली, ( महा ई न्यूज ) – चिखली परिसरातील भंगार गोदामांना पुन्हा भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये आठ गोदामांनी पेट घेतला आहे. अग्निशामक दलाचे सात बंब घटनास्थळी दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे.
दोन दिवसांपूर्वी चिखली येथील कुदळवाडी परिसरात भंगार मालाची आठ गोदामे जळून खाक झाली होती. त्यातच आज पुन्हा भंगार गोदामांना पुन्हा आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी दाखल झाला. यावेळी अग्निशामक दलाच्या गाड्याही दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे.