पुणे

कासारवाडीत रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

पिंपरी- कासारवाडी येथील गॅलॅक्‍सी क्‍लिनिकच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त येत्या रविवारी (दि.23) मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. महेश शेटे व डॉ. सुप्रिया शेटे यांनी दिली.
या शिबिरात रक्‍तशर्करा (शुगर), हिमोगिलोबिन, हाडांची घनता, डायबेटीस स्क्रीनिंग या तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत. या शिवाय सवलतीच्या दरात थायरॉईड तपासणी व स्वाईन फ्ल्यू लस दिली जाणार आहे. सवलतीच्या दरातील तपासण्या ऐच्छिक आहेत. तर रक्त तपासणीसाठी उपाशीपोटी येणे आवश्‍यक आहे. मोफत आरोग्य तपासणीसाठी नाव नोंदणी आवश्‍यक आहे. त्यासाठी 9850111201 या क्रमांकावर संपर्क साधावा. कासारवाडी पोस्ट ऑफीससमोरील शेळके अपार्टमेंटमधील गॅलॅक्‍सी हेल्थ सेंटरमध्ये रविवारी सकाळी साडे नऊ ते दुपारी दोन या वेळेत हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. महेश शेटे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button