राजकारण

‘कट्टापाने बाहुबली को क्‍यो मारा ?’ : जयंत पाटील

मुंबई : ‘कट्टापाने बाहुबली को क्‍यो मारा ? राज्यासमोर सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे. की कट्टाप्पाने बाहूबलीला का मारले.
त्याबाबत खडसें बोलले तर कटप्पा कोण आणि बाहुबली कोण ते समजेल…’ पण खडसेसाहेब काही तोंडच उघडत नाहीत अशी कोपरखळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील यांनी मारली. जीएसटी बील मंजूरीच्या अधिवेशन ते बोलत होते.

पाटील म्हणाले, ” आम्ही संघर्ष यात्रेत नाथाभाऊंच्या घरी गेलो होतो. ते आमच्या स्वागताला उभे होते. का होते हे काय आम्हाला कळले नाही. त्यामुळे आम्ही नाथाभाऊच्या घरी गेलो. माणूस सत्तेतून बाहेर गेला की समाधानी, सुखी होतो असा चिमटा काढत त्यांनी तुफान फटकेबाजी केली. यावर समोरच्या बाकावर बसलेले एकनाथ खडसे म्हणाले, “कट्टाप्पाने बाहूबलीला का मारले हे शोधायला तुम्ही आला होता.” यावर सदस्यांमध्ये हास्यकल्लोळ उडाला. त्यावर जयंत पाटील म्हणाले, “” खडसें बोलले तर कटप्पा कोण आणि बाहुबली कोण ते समजेल. ते बोलले तर भूकंप येईल. पण, ते काही बोलतच नाहीत.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button