आझाद मैदानावर पुन्हा मराठ्यांचा एल्गार

- विद्यार्थी आंदोलनाला बसणार
मुंबई – मराठा समाजातील मुलांच्या वैद्यकीय प्रवेश सवलतीचा तिढा सुटलेला नाही. याच कारणामुळे मराठा समाजातील विद्यार्थी थोड्याच वेळात आझाद मैदानावर आंदोलनाला बसणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या शैक्षणिक सवलतीबाबत विचार करण्यासाठी उद्या मुंबईतील शिवाजी मंदिरात मराठा मोर्चाची राज्यस्तरीय बैठक पार पाडणार आहे.
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा तिढा अखेर सुटला आहे. कारण मराठा आरक्षणांतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांची फी राज्य सरकार भरणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. अण्णाभाऊ पाटील महामंडाळामार्फत विद्यार्थ्यांची फी देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात 30 नोव्हेंबर 2018 रोजी मराठा आरक्षण लागू करण्यात आलं. मात्र नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार या आरक्षणाचा लाभ मेडिकल विभागातील कोणत्याच विद्यार्थ्याला घेता येत नाही. कारण मराठा आरक्षण लागू होण्याआधी 13 नोव्हेंबर रोजी मेडिकलचे नोटिफिकेशन आल्याने त्यांना या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. सुप्रीम कोर्टानेही नागपूर खंडपीठाचा हा निर्णय कायम ठेवला आहे.