…अन्यथा तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल, चंद्राबाबू नायडू यांचा मोदींना इशारा

तेलुगू देसम पक्षाच्या (टीडीपी) उमेदवार आणि समर्थकांवर आयकर विभागाकडून सुरु असलेल्या छापेमारीविरोधात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू विजयवाडा येथे धरणे आंदोलनाला बसले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इशाऱ्यावरुनच ही छापेमारी सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चेतावणी देत यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा दिला आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या आदेशानंतरच टीडीपीच्या नेत्यांवर छापेमारी केली जात आहे. एकदा निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्व काही निवडणूक आयोगाच्या देखरेखेखाली झालं पाहिजे. सर्व पक्षांना समान संधी मिळाली पाहिजे. एकाही पक्षाला ते मागे टाकू शकत नाहीत आणि एकाला ते समर्थन देऊ शकत नाहीत’, असं चंद्राबाबू नायडू यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना त्यांनी नरेंद्र मोदींना चेतावणी दिली आहे. ‘मी पंतप्रधानांना चेतावणी देत आहे. जर त्यांनी हे थांबवलं नाही तर मोठी किंमत चुकवावी लागेल. आम्ही लोकशाही आणि भारताचा बचाव करण्यासाठी लढत आहोत’. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींना तुम्ही कोण आहात अशी विचारणाही केली. तुम्ही जाणारे पंतप्रधान आहात असा टोला त्यांनी मारला आहे.