Mahaenews

अंधेरीतील फूटओव्हर ब्रिजवर एकाची भोसकून हत्या

Share On

मुंबई ः अंधेरीतील फूटओव्हर ब्रिजवर एका 27 वर्षीय तरूणीची भोसकून हत्या करण्यात आली आहे. बुधवारी रात्री ही घटना घडली आहे. याप्रकरणी डीएन नगर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे. या हत्येमध्ये आणखी एका व्यक्तीला सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

हत्या झालेल्या तरूणीची अण्णा बिबि शेख अशी ओळख पटली आहे. शेखही एका बार-रेस्टॉरन्टमध्ये काम करत होती. शेखची हत्या करणाऱ्यांचं तिच्याशी काही नातं होतं का? याचा तपास पोलिसांकडून केला जातो आहे. पुलाच्या पायऱ्यांवर सगळीकडे रक्त होतं, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. अंधेरीतील एसव्ही रोडवरील फारूकिया मशिदीजवळ असणारा हा फूटओव्हर ब्रिज अंधरी पूर्व व पश्चिमेला जोडतो.

रेल्वे स्टेशनजवळ असणाऱ्या पुलाजवळ याआधीही हत्या झालेलं पाहायला मिळालं आहे. मे 2016मध्ये एका 23 वर्षीय तरूणीती चेंबूरनाक्याजवळीत अण्णाभाऊ साठेपुलावर हत्या झाली होती. दादरमधील भूमी प्लाझामध्ये सेल्स गर्ल म्हणून ही तरूणी काम करत होती.

 एप्रिल 2016मध्ये विरारमधील फूटओव्हर ब्रिजवर एका 40 वर्षीय व्यक्तीची हत्या झाली होती. ऑफिसमधील सहकाऱ्यांनी भोसकून हत्या केल्याचं समोर आलं होतं. आरोपी व हत्या झालेली व्यक्ती एकत्र कामाला होते. कामाच्या ठिकाणी खासगी कारणावरून झालेल्या वादात हत्या करण्यात आली होती.

Exit mobile version