breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

‘स्मार्ट सिटी’तून उभारणार ‘क्रीडा संकुल’

  • स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता
  • सर्वसमावेश क्रीडा संकुलास 34 कोटीचा खर्च अपेक्षित

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरात सर्व खेळांमधील खेळाडू निर्माण व्हावेत, त्यांना एकाच ठिकाणी आतंरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळांडूकडून प्रशिक्षण मिळावे, या उद्देशाने स्मार्ट सिटी प्रकल्पातंर्गत पीपीपी तत्वावर क्रीडा संकूल उभारण्यात येणार आहे. सर्व खेळांचा समावेश असलेल्या संकूल उभारणीस 34 कोटी खर्च येणार असून त्यास स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड संचालक मंडळाची आठवी बैठक आज (शुक्रवार) महानगरपालिका आयुक्त कक्षात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, केंद्र शासन प्रतिनिधी ममता बात्रा, महापाैर राहूल जाधव, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, विरोधी पक्षनेते दत्ता साने, संचालक प्रमोद कुटे, सचिन चिखले, पोलिस आयुक्त आर.के.पद्यनाभन, पीएमपी व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे, विभागीय आयुक्त पी.एस.खांडकेकर, आयुक्त तथा सीईओ श्रावण हर्डिकर, निळकंठ पोमण, राजन पाटील, लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे आदी उपस्थित होते.

स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या एरिया बेस डेव्हलपमेंटमधून सर्व खेळांना एकत्रित असणारे क्रीडा संकूल उभारण्यात येणार आहे. महापालिकेच्या उद्यानासाठी आरक्षित असणा-या साडेचार एकरात हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. हे क्रीडा संकूल बांधा, वापरा आणि हस्तांतर (पीपीपी) तत्वानूसार करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड शहरात नव्याने खेळाडू घडविण्यासाठी स्मार्ट सिटी हा प्रकल्प उभारणार आहेत. या क्रीडा संकूलात सर्व खेळांचे मैदाने तयार करुन त्यासाठी पायाभूत सोयी-सुविधा तयार करण्यात येणार आहे. त्यांना वेगवेगळ्या प्रशिक्षित  खेळाडूंकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच शहरातील गरजू खेळाडूंना योग्य प्रशिक्षण देवून नवोदित राष्ट्रीय खेळाडू बनवण्याचा आमचा मानस आहे, असे सीईओ तथा आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button