breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

संविधान जनजागरण अभियानात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ

पिंपरी – श्री संत रोहिदास महाराज समाज उन्नती संस्था काळेवाडी, पुणे व पद्मयानी बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान जनजागरण अभियानचे १२ पुष्प व शहरामधील चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ रविवार (दि. 30)  आयोजित करण्यात येणार आहे.

 

भारतीय संविधान जानजागरण अभियानाचे १२ वे पुष्प डॉ. विजय खरे सर डायरेक्टर, डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स ॲण्ड स्ट्रॅटेजिक स्टडीज सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, गणेश खामघल वरिष्ठ व्यवस्थापक मिटकॉन, महाराष्ट्र शासन हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व गुणवत्तेबाबत मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये सन 2017-18 या शैक्षणिक वर्षातील 75 टक्के पेक्षा अधिक गुण मिळविलेल्या इयत्ता 10 वी व 12 वी तसेच राज्य व राष्ट्रीय स्तरावर कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

 

शहरामधील चर्मकार समाजातील सर्व समाजबांधवांना आव्हान करण्यात येत आहे की, 75 पेक्ष अधिक गुण प्राप्त असणाऱ्या विद्यार्थ्यांनी किशोर गवळी (9960246345), सागर सूर्यवंशी (9881609312), प्रविण सूर्यवंशी (8087258308) यांच्याशी दि. 24 सोमवारपर्यंत संपर्क करून गुणपत्रिकेची व राशनकार्डची झेरॉक्स प्रत सादर करावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष सागर सूर्यवंशी आणि विष्णू मांजरे यांनी केले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button