breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

शेतक-यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना पाठविली मनिऑर्डर

बारामती – जैनकवाडी (ता. बारामती) येथील शेतकरी दिनेश नामदेव काळे यांनी बाजारभावाअभावी दोन टन कांदे मोफत वाटले. या वेळी दानपेटीत जमा झालेल्या रकमेतून सोमवारी (दि. 10) त्यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना प्रत्येकी 1419 रुपयांची मनिऑर्डर करून अनोख्या पद्धतीने सरकारचा निषेध केला आहे.

शेतकरी काळे यांनी दोन मुलांसह बारामती नगरपरिषदेसमोर बुधवारी (दि. 5) मोफत कांदा वाटप केले. कांद्याला समाधानकारक दर मिळत नसल्याच्या निषेधार्थ त्यांनी हे पाऊल उचलले होते. या वेळी जवळच दानपेटी ठेवून स्वेच्छेने दान करण्याचे आवाहनही त्यांनी केले होते. त्यातून त्यांना 2 हजार 980 रुपयांची रक्‍कम जमा झाली होती. खा. राजू शेट्टी यांनीही या शेतकर्‍याची भेट घेत सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकर्‍यावर शेतमाल फुकट वाटण्याची वेळ आल्याची टीका केली होती.

शेतकरी काळे यांनी बारामती पोस्ट कार्यालयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही मनिऑर्डर पाठवली. प्रत्येकी 1419 रुपये पाठविले. त्यासाठी त्यांना प्रत्येकी 71 रुपयांचा खर्च आला.

गेली चार वर्षे शेतमालाला अजिबात दर मिळत नाही. मातीमोल दराने शेतमाल विकावा लागत आहे. दुर्दैवाने शासन शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे कांदा विक्री करतानाच अशा शेतकर्‍यांच्या अभिनंदनाचा फलक मी लावला होता. आता दानपेटीतील रक्‍कम पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना पाठवली आहे.     – दिनेश काळे, शेतकरी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button