breaking-newsमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

मुंबईच्या २७ वर्षीय अंकितीची भरारी, ९७ कोटी डॉलरच्या ई-कॉमर्स कंपनीची CEO

मुंबईची २७ वर्षीय अंकिती बोस या तरूणीने अवघ्या चार वर्षाच्या काळात आपल्या झीलिंगो ई-कॉमर्स कंपनीला शिखरावर पोहचवले आहे. अंकिती बोसच्या कंपनीला युनिकॉर्नचा दर्जा मिळवण्याच्या अगदी जवळ नेणारी अंकिती ही पहिली भारतीय महिला बनली आहे. जीलिंगो ही दक्षिण-पूर्ण आशियातील नामांकित फॅशन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म कंपनी आहे. जीलिंगो हे प्लॅटफॉर्म थायलंड, इंडोनेशिया आणि फिलिपीन्समध्ये लोकप्रिय आहे. अंकिती ही या कंपनीची सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीही आहे.

ज्या कंपनीची वार्षिक उलाढाल एक अब्ज अमेरिकी डॉलर्स असेल त्या कंपनीला यूनिकॉर्नचा दर्जा दिला जातो. अंकिता-ध्रुव यांच्या स्टार्टअपचे बाजारमूल्य सध्या ९७० मिलियन डॉलर्स एवढे आहे. जीलिंगो कंपनीचे मुख्यालय सिंगापूरमध्ये असून या कंपनीची टेक टीम बंगळुरूमधून काम करते. कंपनीचा आणखी एक सहसंस्थापक आयआयटी गुवाहाटीमध्ये शिकणारा २४ वर्षीय विद्यार्थी ध्रुव कपूर आहे. ध्रुवच्या टीममद्ये जवळपास १०० जण काम करतात.

Jon Russell

@jonrussell

Southeast Asia e-commerce startup Zilingo just announced a $226M Series D round — that’s $308M raised in just 3.5 years, latest valuation is close to $1B https://techcrunch.com/2019/02/11/zilingo-raises-226m/ 

E-commerce startup Zilingo raises $226M to digitize Asia’s fashion supply chain

If you’re looking for the next unicorn in Southeast Asia, Zilingo might just be it. The 3.5-year-old e-commerce company announced today that it has raised a Series D round worth $226 million to go…

techcrunch.com

See Jon Russell’s other Tweets

अंकितीने २०१२मध्ये अर्थशास्त्र आणि गणितामध्ये मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमधून पदवी घेतली आहे. बँकेतील एका प्रसंगानंतर तिने ऑनलाइन मार्केटमध्ये उतरण्याचे ठरवले. त्यानंतर २०१४ तिची ओळख ध्रुवशी झाली. त्यावेळी त्यांनी दोघांनी मिळून या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यावर तात्काळ काम सुरू केलं. भारतात फिल्पकार्ट, अॅमेझॉन सारख्या कंपनीने आपलं जाळं निर्माण केल्यामुळे त्यांनी भारताबाहेर उतरवण्याचे ठरवलं. त्यांच्या मनातील कल्पाना प्रत्येक्षात २०१५मध्ये जीलिंगोच्या नावाने अस्तित्त्वात आली. आज चार वर्षानंतर तब्बल ही कंपनी ९७० मिलियन डॉलर्सची झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button