breaking-newsआंतरराष्टीय

बुडालेल्या युवकाला शोधताना 6 पाणबुड्‌यांचा मृत्यू

क्‍वालालंपूर (मलेशिया)- येथील एका तलावात बुडालेल्या युवकाला शोधण्यास गेलेल्या सहा पाणबुड्‌यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. क्‍वालालंपूर जवळील पुचोंग शहरातील एंजलर्स तलावात (पोखर) बुधवारी एक युवक बुडाला होता. 17 वर्षे वयाचा हा युवक मासे पकडण्यासाठी गेला असता बेपत्ता झाल्याची माहिती देण्यात आली. त्याचा शोध घेण्यासाठी सहा पाणबुडे एंजलर्स येथे गेले होते, पण बुडी मारल्यानंतर ते सहाही जण पाण्याखालून पुन्हा वर आले नाहीत. सुमारे अर्ध्या तासानंतर त्यांना बाहेर काढण्यात आले पण तत्पूर्वीच ते मरण पावले होते, असे आपात्कालीन सहाय विभागाचे महासंचालक मोहम्मद महदान वाहिद यांनी पत्रकारांना सांगितले.

आम्ही आमचे सहा चांगले पाणबुडे गमावले आहेत, असे स्थानिक पोलीस प्रमुख अब्दुल अझीझ अली यांनी म्हटले आहे. पाणबुड्यांना अर्ध्या तासानंतर पाण्याबाहेर काढण्यात आले, पण त्यापूर्वीच बेशद्धास्थेतच गेलेले होते. नंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. एंजलर्स तलावात गायब झालेल्या युवकाचा शोध जारी असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button