breaking-newsमहाराष्ट्र

प्रभू श्रीरामाचा पुतळा 221 मीटरचा असल्यास शिवस्मारकाच्या उंचीवर पुनर्विचार – विनायक मेटे

अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या प्रभू श्रीरामाच्या पुतळ्याची उंची 221 मीटर असल्यास शिवस्मारकाच्या उंचीवर पुनर्विचार केला जाईल असं वक्तव्य शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केलं आहे. आधीच पुतळ्याची उंची कमी करत तलवारीची उंची वाढवल्याने राज्य सरकारवर टीका झाली होती. त्यात आता विनायक मेटे पुतळ्याची उंची वाढवण्याची मागणी करत आहेत.

शिवाजी महाराजांचा पुतळा जगात सर्वात उंच असावा अशी शिवप्रेमींची भावना असताना अयोध्येत प्रभू श्रीरामाचा 221 मीटर उंच पुतळा उभा राहणार असल्यास शिवस्मारकाच्या उंचीवर पुनर्विचार केला जाईल असं विनायक मेटे यांनी म्हटलं आहे. जालन्यात शिवसंग्राम जिल्हा मेळाव्यात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

‘उत्तर प्रदेशात प्रभू श्रीरामाची 221 मीटर उंच मूर्ती उभारली जाणार असल्याचं मला कळालं. जर ही बातमी खरी असेल तर शिवस्मारकाच्या उंचीबाबत आम्ही पुनर्विचार करु. आम्ही सरकारकडे पुतळ्याची उंची वाढवण्याची मागणी करु. शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि त्यामुळे त्यांचा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा असावा अशी शिवप्रेमींची भावना आहे’, असं विनायक मेटे बोलले आहेत.

शिवस्मारकाची एकूण उंची 210 मीटर असणार आहे. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने बांधकाम खर्चात कपात कऱण्यासाठी पुतळ्याची उंची कमी करण्याचा निर्णय घेतला होता. पुतळ्याची उंची ८३.२ ऐवजी कमी करुन ७५.७ मीटर करण्यात येणार असून तलवारीची उंची ३८ मीटर ऐवजी ४५.५ मीटर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पुतळ्याची एकूण उंची कमी होणार नसून १२१.२ मीटरच राहणार आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत रामाचा पुतळा उभारणार असल्याचं जाहीर केलं होतं. पुतळ्याची एकूण उंची 151 मीटर असणार आहे. तसंच त्यावरील छत 20 मीटर आणि 50 मीटरचा पाया असणार आहे. यामुळे पुतळ्याची एकूण उंची 221 मीटर असणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button