breaking-newsराष्ट्रिय

पैशांची चणचण, तरीही अमरिंदर सरकार करणार आलिशान वाहनांसाठी ८० कोटींची उधळपट्टी

पंजाबमध्ये अमरिंदर सिंग सरकारला निधीची कमतरता भासत असली तरी मुख्यमंत्री, मंत्री आणि वरिष्ठ नोकरशाह यांच्यासाठी आलिशान वाहने खरेदी करण्यासाठी मात्र कोणतीही हयगय केली जात नसल्याचे दिसून येत आहे. पंजाबच्या परिवहन विभागाने १६ लँड क्रुझर गाड्या खरेदी करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. यामध्ये दोन बुलेटप्रुफ गाड्यांचाही समावेश आहे.

मुख्यमंत्र्यांच्या कर्मचाऱ्यांसाठीही १३ महिंद्रा स्कॉर्पिओ घेण्याचेही नियोजन आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींसाठी १४ मारुती डिझायर किंवा होडा अमेझ किंवा मारुती अर्टिगा खरेदी करण्याचा प्रस्ताव आहे. परिवहन विभागाने १६ लँड क्रुझर खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. यातील दोन बुलेटप्रुफ वाहनांचा वापर मुख्यमंत्री अमरिंदर सिंग स्वत: करतील.

विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांकडे आधीपासूनच आलिशान वाहनांचा ताफा आहे. यामध्ये ६ मित्सुबिशी मोंटेरो आणि अॅम्बेसेडर कार आहेत. अमरिंदर सिंग यांनी आपल्या १७ कॅबिनेट सहकाऱ्यांसाठीही टोयोटो फॉर्च्युनर खेरदी करण्यास मंजुरी दिली आहे. राज्य सरकार आमदारांसाठीही ९७ टोयोटो क्रेस्टा घेण्यात येणार आहे.

दरम्यान, पंजाब सरकारने माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल आणि अकाली दल बादलचे पमुख सुखबीरसिंग बादल यांच्यासाठी नवीन बुलेटप्रुफ लँड क्रुझर खरेदी करण्याचा प्रस्ताव नाकारला आहे. निधीची कमतरता हे कारण त्यांना सांगण्यात आले. पंजाबचे अर्थमंत्री मनप्रित सिंग बादल म्हणाले की, बादल पिता-पुत्रांकडे उपलब्ध असलेले बुलेटप्रुफ वाहन चांगल्या स्थितीत असून ते बदण्याची आवश्यकता नाही.

नवीन वाहन खरेदी करण्यासाठी राज्य सरकारच्या खजिन्यावर ८० कोटींचा बोजा पडणार आहे. पंजाब सरकारवर १,९५,९७८ कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा आहे. अशात आलिशान कार खरेदी वर इतके पैसे खर्च करण्यावरुन मोठी टीका केली जात आहे.

यापूर्वी प्रकाशसिंग बादल सरकारच्या कार्यकाळातही २०१६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यासाठी १४ टोयोटा लँडक्रुझर, १०० टोयोटा इनोव्हा आणि मारुती जिप्सी खरेदी करण्यात आले होते. यावर १२ कोटी रुपये खर्च घातले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button