breaking-newsआंतरराष्टीय

नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटनकडे मागणी

लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेचे हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून विदेशात फरार झालेल्या नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणासाठी भारताने ब्रिटनकडे प्रत्यार्पण प्रस्ताव पाठवला आहे. काही दिवसांपूर्वी नीरव मोदी याच्या विरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती.

नीरव मोदी गेल्या अनेक महिन्यापासून विदेशात फरार झाला आहे. आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनांनी त्याच्यावर नजर ठेवा असे आदेश इंटरपोलने दिले आहेत. एखाद्या देशातील गुन्हेगार जर विदेशात पळून जावून लपून राहत असल्यास त्याच्यावर इंटरपोल रेड कॉर्नर नोटीस जारी करीत असते. या नोटीसमध्ये या व्यक्तीवर पाळत ठेवली जात असून त्याच्यावर आंतरराष्ट्रीय पोलिसांकडून नजर ठेवली जात असते.

खोटी हमी देवून हा इतका मोठा घोटाळा करण्यात आला असून सध्या नीरव मोदी यांच्या 11 राज्यांमधील 35 ठिकाणांवर छापे मारण्यात आले आहेत. तसेच नीरव मोदी यांच्या 29 जागा आणि 105 बॅंक खाते देखील आतापर्यंत गोठवण्यात आली आहेत. 2011 पासून नीरव मोदी व्यवहारासाठी खोटा परवाना वापरात होता. निरव मोदी याच्या विरुद्ध सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी, सीबीआय, आयटी आणि डीआरआय हे विभाग कसून चौकशी करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button