breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंवर बेळगावात गुन्हा दाखल

बेळगाव – महामेळाव्यासाठी परवानगी मागूनही न देणाऱ्या कर्नाटकी पोलीस प्रशासनाने खरा रंग दाखवला आहे. महामेळाव्याला परवानगीच नसताना तो घेतला असे कारण देत महाराष्ट्र विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. धनंजय मुंडेंसह शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे, महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यासह नऊ जणांविरुद्ध टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिवाळी अधिवेशन सुरु असताना संबंधित जागेच्या मालकाकडून, तसेच संबंधित सरकारी कार्यालयातून परवानगी आवश्यक होती, मात्र ती घेतली नाही असा आरोप धनंजय मुंडेंसह सर्वांवर आहे. याशिवाय पोलीस खात्याकडूनही परवानगी न घेता सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर अतिक्रमण करणे, व्यासपीठ उभारणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बंदी झुगारुन धनंजय मुंडे बेळगावात

सीमाभागातील मराठी लोकांच्या लढ्याला बळ देण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे काल बेळगावात दाखल झाले. मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास धनंजय मुंडे बेळगावात पोहोचले. कर्नाटक सरकारचे बेळगावमध्ये मंगळवारपासून अधिवेशन सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सोमवारी बेळगावात मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला धनंजय मुंडे यांनी संबोधित केलं.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button