breaking-newsआंतरराष्टीय

किम जोंग उन यांना व्हाईट हाऊस निमंत्रणाचे ट्रम्प यांचे संकेत

वॉशिंग्टन (अमेरिका) – उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांना व्हाईट हाऊसमध्ये येण्यासाठी निमंत्रण देण्याची शक्‍यता डोनॉल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. जर किम जोंग उन यांच्याबरोबर होणारी 12 जूनची शिखर परिषद चांगल्या प्रकारे पार पडली, तर किम जोंग उन यांना व्हाईट हाऊस भेटीचे निमंत्रण दिले जाऊ शकेल, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. 12 जूनच्या शिखर परिषदेसंदर्भात जपानचे पंतप्रधान शिंजो ऍबे यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर ट्रम्प पत्रकारांशी बोलत होते.

किम जोंग उन यांना व्हाईट हाऊसचे निमंत्रण देणार, की मार-ए-लागोमध्ये बोलावणार? असा प्रश्‍न पत्रकारांनी विचारल्यानंतर ट्रम्प यांनी खुलासा करताना सांगितले. किम जोंग उन यांनी आपल्याला गेल्या आठवड्यात एक पत्र पाठवले होते. त्या पत्रात अभिवादनाशिवाय आणखी काहीही नव्हते. एका दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे. ते पत्र सार्वजनिक करण्याची माझी इच्छा आहे, आणि तसे करण्यासाठी मला बहुदा संमती मिळेल, असे स्पष्ट करून ट्रम्प पुढे म्हणाले, की जर शिखर परिषदेतून इप्सित साध्य होणार नसेल, तर आपण अजूनही ती रद्द करू शकतो.

जरी मी शिखर परिषद रद्द करण्याच्या तयारीत असलो, तरी तसे करण्याची वेळ येणार नाही, कारण आपली जनता, आपले परिजन आणि आपण स्वत: अशा सर्वांसाठी किम जोंग उन काहीतरी चांगले करू इच्छितात असा आपल्याला विश्‍वास असल्याचे डोनॉल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button