breaking-newsराष्ट्रिय

ऍपलच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी 25 लाखांची भरपाई

लखनौ- पोलिसांच्या गोळीबारामध्ये मरण पावलेल्या ऍपल कंपनीचे पदाधिकारी विवेक तिवारी यांच्या पत्नीने 1 कोटी रुपयांच्या भरपाईची मागणी केली आहे. मात्र पदाधिकाऱ्याच्या नातेवाईकांना 25 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश लखनौच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत. संबंधित अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करण्यात येत आहेत, असेही दंडाधिकारी कौशल राज यांनी म्हटले आहे. पोलिसांकडून झालेल्या गोळीबाराची चौकशी करण्यात येईल, ही चौकशी 30 दिवसात पूर्ण करण्यात येईल. तसेच तिवारी यांच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरीमध्ये सामावून घेतले जाईल, असेहा दंडाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
लखनौमधील गोमतीनगर भागात शुक्रवारी रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. पोलिसांनी इशारा केल्यानंतरही विवेक तिवारी यांनी कार न थांबवल्याने कारमध्ये कोणी गुन्हेगार असल्याच्या संशयावरून पोलिसांनी गोळीबार केला होता. त्यामध्ये विवेक तिवारी यांचा मृत्यू झाला होता.
या घटनेची “एसआयटी’मार्फत चौकशी केली जाईल, असे उत्तर प्रदेशचे मंत्री आशुतोष टंडन यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही ही घटना म्हणजे निव्वळ गुन्हा असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिले असून संबंधित पोलिसांवर कारवाईचे आदेश देण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button