breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अटलजींना श्रद्धांजली वाहण्यासाठी निगडीत सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन

पिंपरी  दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. निगडी प्राधिकरणातील सावरकर भवनात रविवारी सायंकाळी साडेचार वाजता शोकसभा होणार आहे. अटलजी प्रेमी आणि मित्र परिवारातर्फे सभेचे आयोजन केले आहे. अटलजीप्रेमी आणि मित्र परिवाराचे समन्वयक अमोल थोरात यांनी दिली.

अटलबिहारी वाजपेयी अजातशत्रू होते. प्रत्येक भारतीयाने त्यांचा आदर केला. गुरुवार, दि. 16 ऑगस्ट रोजी त्यांचे निधन झाले. त्यामुळे भारताचे एक रत्न निखळले. एक ओजस्वी व्यक्तीमत्व आपल्यातून निघून गेले आहे. त्यांच्या केवळ आठवणी आपल्याकडे आहेत. याच आठवणींना उजाळा देण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व राजकीय पक्ष, विविध संस्था, संघटना, सार्वजनिक मंडळ, विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्यातर्फे या सभेत अटलजींना श्रध्दांजली अर्पण करण्यात येणार आहे.

आपले आयुष्य देशासाठी समर्पित करून निस्वार्थ देशसेवा केलेल्या अटलजींना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी शहरवासीयांनी उपस्थित रहावे,  असे आवाहन या प्रसिद्धी पत्रकातून करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button