breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

खासदार ब्रिजभूषण सिंगला तात्काळ अटक करा; युवक काँग्रेसची मागणी

पुणे : अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांना तात्काळ अटक करा या मागणीसाठी युवक कॉंग्रेस तर्फे गुडलक चौक येथे आंदोलन करण्यात आले. यापुढे खेळाडू मिळणार नाही असा देखावा सादर करण्यात आला. ब्रिजभूषण सिंग यांच्या या कृती मुळे भारतीय क्रिडा क्षेत्रासाठी हा सर्वात मोठा काळा डाग आहे अशी खंत व्यक्त करण्यात आली.

यावेळी माजी ऑलिम्पिक खेळाडू मारुती आडकर, अभय छाजेड, संगीता तिवारी, गोपाळ तिवारी, अक्षय जैन, राहुल शिरसाट, हनुमंत पवार, प्रथमेश अबनावे, संतोष पाटोळे, राजू ठोंबरे, आनंद दुबे, अंकुश देशमुख, गौरव बाळंदे, पुनमीत तिवारी, दिलीप देशमुख, विश्वजीत जाधव, भाविका राका, सचिन भोसले, पुनमीत तिवारी, गणेश उबाळे, अनिकेत अडसूळ, यश राजपूत, प्रदीप ठोंबरे, महेश गायकवाड उपस्थित होते.

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस अभय छाजेड म्हणाले की जे खेळाडू वर्षानुवर्षे तयारी करतात,कर्ज काढून मेहनत करतात आणि निर्णायक टप्प्यावर आल्यानंतर ब्रिजभूषण सारख्या व्यक्ति कडून याप्रकारे छळ केला जात असेल तर ते सहन केल जाणारे नाही.

हेही वाचा – ‘राज ठाकरेंना मिमिक्रीशिवाय दुसरं जमतं काय’; अजित पवारांचं ठाकरेंना प्रत्युत्तर

युवक काँगेसचे प्रदेश सरचिटणीस अक्षय जैन म्हणाले ऑलिम्पिक पदक तसेच आंतरराष्ट्रीय पदक विजेते खेळाडू 10 दिवस उलटून गेले तरी दिल्लीत आंदोलन सुरूच आहे आणि त्यांच्या वर पोलिसांकडून जर मारहाण होत असेल तर या पेक्षा मोठी शोकांतिका नसेल. एका प्रकारे सरकारकडून खेळाडूं वर दहशीतच वातावरण तयार केलं जातय. फक्त सत्ताधारी पक्षाचे खासदार आहेत म्हणुन त्यांना वाचवलं जातय. इतक्या खालच्या पातळीवर जाऊन सुद्धा भारतीय जनता पक्ष त्यांची बाजू घेऊन आंदोलक खेळाडूंच्या विरोधात सोशल मीडिया वर ट्रेंड सुरू केलाय या पेक्षा अजून किती खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करेल माहिती नाही. पण यांचा खरा चेहरा लोकांसमोर आलाय. युवक कॉंग्रेस चे पदाधिकारी पुण्यातून दिल्लीत जाणार आहेत, आणि जो पर्यंत अटक होत नाही तो पर्यंत खेळाडूं सोबत थांबणार आहेत असेही असेही जैन म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button