breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘राज ठाकरेंना मिमिक्रीशिवाय दुसरं जमतं काय’; अजित पवारांचं ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबई : शरद पवारांनी अजित पवारांमुळे आपला राजीनामा मागे घेतला अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली. राज ठाकरेंनी आपल्या भाषणात अजित पवारांची मिमिक्री देखील करून दाखवली. दरम्यान, यावरून अजित पवार यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

अजित पवार म्हणाले की, राज ठाकरेंना मिमिक्री शिवाय दुसरं काय जमतं? मिमिक्री करण हा त्यांचा जन्म सिद्ध हक्क आहे. स्वत: चा पक्ष वाढवण्यापेक्षा त्यांना अजित पवार यांची मिमिक्री करणे, अजित पवार यांचे व्यंगचित्र काढणे यामध्ये जर समाधान वाटत असेल, तर माझ्या राज ठाकरेंना शुभेच्छा आहेत, अशा शब्दात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी खिल्ली उडवली.

हेही वाचा – The Kerala Story : ‘द केरला स्टोरी’ चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करा : आमदार महेश लांडगे

राज ठाकरेंना मिमिक्री शिवाय दुसरे काय जमते. मिमिक्री करणे हा राज ठाकरे यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. जनतेने त्यांना नाकारले आहे. पक्षामधून बाहेर पडल्यावर १४ आमदार पहिल्यांदा निवडून आणले. नंतर एक आमदार निवडून आला. जुन्नरच्या शरदराव सोनवणे यांनी मागच्या विधानसभेमध्ये त्यांच्याकडून तिकीट घेतले म्हणून मनसेचा एक आमदार त्यावेळी निवडून आला. नंतर २०१९ मध्ये कल्याणच्या आमच्या सहकाऱ्यांनी त्यांची पाटी लावली म्हणून पुन्हा एकदा एक आमदार आला. त्यांना स्वत:चा पक्ष वाढवण्यापेक्षा अजित पवारची मिमिक्री करणे, अजित पवारचे व्यंगचित्र काढणे यामध्ये जर समाधान वाटत असेल तर माझ्या त्यांना शुभेच्छा, असंही अजित पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button