breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

ग्राहकांना मोठा दिलासा! सरकार मेडिक्लेमच्या ‘या’ नियमात बदल करणार?

Mediclaim : सरकार आणि विमा प्राधिकरण एक नियम बदलण्याबाबत चर्चा करत आहे. नियम बदलल्यास ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मेडिक्लेमसाठी विमाधारक रुग्णाने रुग्णालयात किमान २४ तास रुग्णालयात दाखल असणे आवश्यक असते. मात्र आता याच नियमात बदल करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

सध्या विमाधारक रुग्णाला २४ तासांपेक्षा जास्त काळ शस्त्रक्रियेसाठी किंवा उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यावरच विमा कंपन्या मेडिक्लेम देतात. परंतु हा नियम बदलला जाण्याची शक्यता आहे आणि सरकारने याबाबत विमा क्षेत्र नियामक IRDAI यांच्याशी चर्चा सुरू केली आहे.

हेही वाचा  –  अजितदादांचे कट्टर समर्थक संजोग वाघेरे उद्धव ठाकरेंच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण

मात्र वैद्यकीय उपचार इतके प्रगत झाले आहेत की उपचार आणि शस्त्रक्रिया काही तासांतच पूर्ण होऊ शकतात. २४ तासांपेक्षा कमी कालावधीसाठी हॉस्पिटलायझेशन असल्यास दावे स्वीकारले जात नाहीत. सध्या अनेक प्रकारचे उपचार आहेत जे २४ तासांपेक्षा कमी वेळेत पूर्ण केले जाऊ शकतात त्यामुळे आरोग्य विमा कंपन्यांना या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील असेही त्यांनी नमूद केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button