breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘मराठी राजभाषा दिन’ अन् ‘मराठी भाषा गौरव दिन’ मध्ये फरक काय?

Marathi Bhasha Gaurav Din | २७ फेब्रुवारी प्रत्येक मराठी माणसासाठी गौरवाचा दिवस. ‘मराठी भाषा गौरव दिन’ दरवर्षी २७ फेब्रुवारीला साजरा केला जातो. महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिलं आहे.

‘मराठी राजभाषा दिन’ आणि ‘मराठी भाषा गौरव दिना’मध्ये काय आहे फरक?

मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहेत. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून आणि कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी २०१३ रोजी घेण्यात आला. तेव्हापासून २७ फेब्रुवारी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून घोषित करण्यात आला. पण, अनेकजण मराठी भाषा गौरव दिनालाच ‘मराठी राजभाषा दिन’ असं म्हणतात. तुम्हीही असंच समजत असाल तर तुम्हीही मोठी गल्लत करताय. कारण मराठी भाषेच्या गौरवासाठी साजरे केले जाणारे दिवस हे वेगवेगळे आहेत.

हेही वाचा     –      ‘तुला निपटून टाकू’ अशी भाषा जरांगेंनी फडणवीसांबाबत वापरली; आशिष शेलारांचा हल्लाबोल 

२७ फेब्रुवारीला कुसुमाग्रजांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा केला जातो. मात्र, महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं १० एप्रिल १९९७ रोजी काढलेल्या परिपत्रकात १ मे हा ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, अशा सूचना दिल्या आहेत. तसा महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासूनच ‘मराठी राजभाषा दिन’ १ मे रोजी साजरा करण्यात येत होता. परंतु, कालांतरानं तो विस्मृतीत गेला आणि त्याची आठवण करुन देण्यासाठी १९९७ ला शासनाला पुन्हा परिपत्रक वाढावं लागलं.

मराठीसाठी तीन दिवस :

१ मे – ‘मराठी राजभाषा दिन’

२१ फेब्रुवारी – ‘जागतिक मातृभाषा दिन’

२७ फेब्रुवारी – ‘मराठी भाषा गौरव दिन’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button